
प्रतिनिधी नागपूर
नागपूर, ता. १९: केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी नागपुर ग्रामीण तालुक्यातील कापसी (खुर्द) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध क्षेत्रात ‘हर घर दस्तक’ अभियांनातंर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
या अभियानाअंतर्गत कापसी (खुर्द) येथील चारही वार्डात घरोघरी जाऊन लसीकरण केंद्रापर्यंत न पोहचु शकणार्या वृद्ध महिला, पुरुष, अपंग लाभार्थी यांच्या घरी भेट देऊन लसीकरण करण्यात येत आहे.
गाव शंभर टक्के लसीकरण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत कापसी (खुर्द) येथील सरपंच सुरज पाटील, उपसरपंच अक्षय रामटेके, आरोग्य सेवक मछिंद्र गायकवाड, आरोग्य सेविका जया मोहोड, डॉ. संकल्प कुरुडे, आशासेवीका मिना राऊत, आम्रपाली पाटील, आंगणवाडी सेविका सुचिता बरडे, मदतनीस रजनी पारधी प्रामुख्याने उपस्थित होते!