Breaking News

महिला वनरक्षकास माया वाघीणीने हल्ला करून केले ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- ताडोबा व्याघ्र अभयारण्य येथे वन्य प्राण्यांची गणना करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या एका महिला वनरक्षकावर माया नामक वाघिनीने प्राणघातक हल्ला केला. या हल्यामध्ये ही महिला वनरक्षक ठार झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोलारा गेट जवळ घडली. स्वाती नानाजी ढोमणे (वय 31) असे मृत महिला वनरक्षकाचे नाव आहे. महिला वनरक्षक ठार झाल्याच्या घटनेने ताडोबा व्याघ्र अभयारण्यात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्याघ्र पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र अभयारण्य येथे 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत वन्यप्राणी गणना होत असल्याने ट्रांजिस्ट लाईन टाकण्याचे काम ताडोबा अभयारण्यातील पाणवठ्यावर सुरू आहे. कोलारा गेट जवळील कोअर झोनमध्ये पाणवठा 97 जवळ ट्रांजिस्ट लाईन टाकण्याचे काम सुरू होते, त्यामुळे आज शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वनरक्षक स्वाती नानाजी ढोमणे ह्या चौकीदारासह कर्तव्यावर गेल्या.

कोलारा गेट जवळ कोअर झोनमध्ये पाणवठा 97 कडे जात असताना अचानक समोर माया नामक वाघीण पुढे आली. तिचा रस्ता चुकवून बाजूने जाण्याचा प्रयत्न करताच माया नामक वाघिणीने महिला वनरक्षकावर हल्ला केला. वाघिणीने वनरक्षक स्वाती यांना जंगलात ओढत नेवून ठार केले. त्यानंतर ती वाघिण पळून गेली. नेहमी पर्यटकांना भूरळ घालणा-या ह्या वाघिणीने आज अचानक रौद्र रूप धारण करून वनरक्षकालाच ठार केल्याची माहिती ताडोबात पसरताच खळबळ उडाली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवडज वाहतुकीच्या नावावर अवैध वसुलीचा धंदा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथुन जवळच असलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवजड वाहतुकीच्या नावाखाली …

वाढतोय उष्माघाताचा धोका, खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved