
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटुन सुध्दा चिमूर तालुक्यात अवैधरित्या मोहाफुलाची दारू,देशी दारू विकणारे विक्रेते सक्रिय आहेत. अशातच आज दिनांक 21/11/21 रोजी सायंकाळी 7.00 वाजताच्या दरम्यान चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकी हद्दीत Api मंगेश मोहोड यांच्या पथकाने दारू रेड केली असता, गोंडेदा ते वडसी रोडवर आरोपी मुकेश गजानन सोनुले वय 25 वर्ष रा. गोंडेदा, मोहित सुधीर कोटरंगे वय 21 वर्ष रा. केवाडा हे नवीन होंडा शाइन (नंबर नसलेली) मोटरसायकलने 26 देशी दारु पावट्या प्रत्येकी 90 मिली वाहतूक करताना मिळून आले.
आरोपींचे ताब्यातून 1) नवीन होंडा शाइन (नंबर नसलेली) मोटरसायकल किंमत अंदाजे रू.80,000/- 2) 26 देशी दारु पावट्या प्रत्येकी 90 मिली किंमत अंदाजे रू.1,300/- असा एकूण रू.81,300/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात येऊन पोलिस स्टेशन ला आरोपींविरुद्ध कलम 65 (अ), 83 म.दा.का. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कार्यवाही पो.नि. मनोज गभने यांचे मार्गदर्शनामध्ये Api मंगेश मोहोड, कर्मचारी प्रमोद पढाळ, प्रमोद गुट्टे यांनी केली.