
प्रतिनिधी नागपूर
नागपूर, दि. 23 : नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी पाच अर्ज दाखल झाले आहेत.
यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे उमेदवार रविंद्र प्रभाकर भोयर यांनी (4) तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे (1) प्रफुल्ल विनोदराव गुडधे (1)- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, मंगेश सुधाकर देशमुख-(1) व सुरेश दौलत रेवतकर(1)-अपक्ष यांचा समावेश आहे. काल 22 नोव्हेंबरला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत एकूण पाच उमेदवारांनी दहा अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षीक निवडणूक-2021 अंतर्गत स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. 16 नोव्हेंबरला या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 24 नोव्हेंबरला दाखल अर्जाची छाननी असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर आहे. तर मतदानाचा दिवस 10 डिसेंबर असा आहे. मतमोजणी 14 डिसेंबरला होणार आहे.