
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर- नेरी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या चिखली गावातील दिलीप सोनवणे यांचा घराजवळील सांडपाण्याची समस्या सोडविण्यात नेरी ग्रामपंचायतीला गेल्या सहा महिन्यापासून अपयश आले. सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते, याबाबत अनेकदा अर्ज विनंत्या करूनही या बाबीकडे संपूर्ण हेतु पुरस्सर नेरी ग्रामपंचायत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दिलीप सोनवाने यांनी केला होता.
चिखली येथील कैलास सोनवाने यांनी घराचे बांधकाम केले यात त्यांच्या संडास आणि न्हाणी घराचे पाणी हे खुलेआम गंगा वाहत आहे तो पाणी दिलीप सोनवणे यांचा घरासमोरून वाहत असल्याने त्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता, तसेच गावातील नागरिकांना याचा खूप मोटा त्रास होत असून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. मागील चार महिन्यांपूर्वी पासून या बाबीची तक्रार अर्ज ग्रा.-पं. नेरीला दिली तेव्हा त्यांनी आरोग्य अधिकारी यांना पाठवले तसेच उपसरपंच व सदस्य याना मौका चौकशी करून अहवाल सादर करुन लवकरात लवकर कारवाई करावी असे ग्रामपंचायत नेरीला आरोग्य विभागाने पत्र दिले होते. नेरी ग्रामपंचायत यांनी कैलास सोनवाने यांना कारवाई चे परिपत्रक सुद्धा दिले होते. मात्र त्या पत्राचा काही उपयोगच झाला नाही.गेल्या सहा सहा महिन्यापासून कुठलीच कारवाई झाली नव्हती.
फिर्यादी दिलीप सोनवाने यांना प्रतीलीपी देऊन नेरी ग्रामपंचायत सुस्त झोपेचे सोंग घेऊन होती. याबाबत नेरी ग्रामपंचायत ला वांरवार विचारपूस केली असता नेरी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सदस्य यांनी सरळ शब्दात सांगितले की ही समस्या आमच्या अंतर्गत येत नाही. ही सांडपाण्याची समस्या गंधगी ही ग्रामपंचायत अंतर्गत येत नाही.
मग नागरीकांनी जाव तरी कुठे नेरी ग्रामपंचायतनी कारवाईच परिपत्रक काढल तरी कस.? कि नेरी ग्रामपंचायत आरोपीच्या दबावाखाली खाली तर नाही ना अशी चिखलीवासीय व आजुबाजूच्या परीसरातील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा चालू होती हि बाब प्रहार संघटनेला कळताच प्रहार संघटनेने यावर लक्ष केंद्रित करुन गोर गरीब सर्व सामान्य नागरीकांना न्याय मिळावा या हेतूने ताबडतोब 1/12/2021ला नेरी ग्रामपंचायत सामोरं आत्मदहन आंदोलनाचे निवेदन तहसीलदार चिमुर, पोलीस स्टेशन चिमुर, ग्रामपंचायत नेरी यांना सदर निवेदन सादर केले.
निवेदन सादर करताच त्वरीत नेरी ग्रामपंचायत यांनी नेरी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड यांच्याकडे धाव घेतली. मोहोड साहेब यांनी उशीरा का होईना तात्काळ रात्री सात ते, आठ वाजताच्या दरम्यान, स्वता आपल्या टिमसह चिखली गावात पोहचुन संबंधित ज्यांच्याकडून सांडपाणी वाहत होते त्यांना व ज्यांच्याकडे सांडपाणी येत होते अश्या समस्त नागरीकांना आपसात विश्वासात घेऊन ताबडतोब समस्या मार्गी लावली महत्त्वाच म्हणजे नेरी ग्रामपंचायत नी गेल्या सहा महिन्यापासून सांडपाण्याची समस्या दूर करण्यात अपयशी ठरली तीच समस्या नेरी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड यांना एका दिवसात मार्गी लावण्यात यश मिळाले. असुन मंगेश मोहोड व त्यांच्या टिमचे आजुबाजूच्या परीसरातुन नागरिकांकडून व प्रहार संघटने कडुन कौतुक करत आनंद व्यक्त केला जात आहे.व प्रहार संघटनेने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.