
प्रतिनिधी – कैलास राखडे
नागभीड :- एका तरुणाचा मृत्यू विद्युत शाॅकने झाला की, ह्रदयविकाराच्या झटक्याने याबद्दल तर्क काढले जात असेल तरी याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच माहित होणार आहे. भास्कर पुरुषोत्तम दुरबुडे (३१) असे मृतक तरुणाचे नाव आहे. मृतक युवक नागभीड येथील एका वेल्डिंग च्या दुकानात वेल्डरचे काम करीत होता.
गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास त्याचे वेल्डिंगचे काम करत असताना सौम्य विद्युत शाॅक लागला असे सांगितले जात आहे. यावेळी बाजुलाच असलेल्या एका व्यक्तीने आवाज दिला. भास्कर चा आवाज येताच आजुबाजूला असलेले लोक मदतीसाठी धावले व त्यांनी लगेच उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येथे दाखल केले मात्र तोपर्यंत भास्कर ची जिवनजोत मावळली होती त्यामुळे डाॅक्टरांनी मृत घोषित केले.
भास्कर ला शाॅक लागल्याचे त्यांनी सांगितले जात असेल तरी मात्र शाॅक लागल्याच्या कोणत्याही खुणा त्याच्या शरीरावर आढळल्या नाही. त्यामुळे भास्कर चा मृत्यु ह्रदयविकाराच्या झटक्याने कींवा अन्य कारणांमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीसांना याबाबत कळविण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा आणि ग्रामीण रुग्णालयात प्रेताचा पंचनामा केला. मृतक नागभीड येथुन ७ किमीवर असलेल्या मिंडाळा येथील रहिवासी असून मागील वर्षी च त्याचे लग्न झाले होते . त्याच्या अकाली निधनानंतर हळहळ व्यक्त होत आहे.