
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर दि. 3 डिसेंबर : पोलिस स्टेशन, रामनगर येथे मोठ्या प्रमाणात बेवारस स्थितीत वाहने ठेवण्यात आली असल्याने पोलीस स्टेशन परिसरात जागा अपुरी पडत आहे. आतापर्यंत एकूण 93 वाहने बेवारस स्थितीत मिळून आल्याने बऱ्याच वर्षापासून स्टेशन परिसरात जमा आहेत. सदर वाहनांची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने तसेच वाहन मालकाचा शोध घेऊन त्यांना सदर वाहने परत करावयाचे आहे. सदर वाहनांची यादी पोलिस स्टेशन रामनगर येथे उपलब्ध आहे. तरी 15 दिवसाच्या आत वाहनमालकांनी पोलीस स्टेशन, रामनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक मधुकर गिते यांनी केले आहे.