Breaking News

कार पलटी होऊन अपघातात माय-लेकी व आजोबांचा मृत्यू


चिमूर : – भरधाव वेगाने कार चालविणे जिवावर बितले असून चिमूर-उमरेड मार्गावरील भिसी-खापरी रोडवर दिनांक.०५ डिसेंबर २०२१ ला ही घटना घडली या ठिकाणी वेनू ह्युंदई कार क्रमांक. एम. एच.३४ बी.व्ही. ३२८४ चा चालक आरोपी अक्षय उत्तम मेश्राम वय २६ वर्षे, रा. उर्जानगर ता. दुर्गापूर, जि. चंद्रपूर हा उमरेड ते चिमुर रोडने खापरी या गावापासून चिमुर च्या दिशेने आपले नमूद कार चालवीत असताना रोडची टर्निंग पास झाल्यानंतर आपल्या कारची स्टेअरिंग पूर्वरत करण्यासाठी हयगयने व निष्काळीपणाने अतिशय जोराने स्टेअरिंग फिरविल्याने कारचे नियंत्रण
सुटून कार विरुद्ध दिशे पर्यंत पलटया होउन व रोडच्या खाली पलटया होत जाउन रोडच्या खाली असलेल्या इलेक्टीक पोलला धडकून पून्हा पलटी होउन कार उलटी झाली.

यामध्ये कारच्या आत बसून असलेले चालक आरोपी याचे आजोबा मोतीराम भिकारी मेश्राम, वय ७० वर्ष आजी सायत्रा मोतीराम मेश्राम, वय ६५वर्षे, रा. खापरी धर्मु. ता. चिमुर आणि आई कमला उत्तम चुनारकर, वय ५० वर्षे रा. उर्जानगर, जि. चंद्रपूर व नातेवाईक नामे उत्तम चोखाराम चुनारकर, वय ५५ वर्षे २ ताजुल नथ्थूजी मेश्राम वय २९ वर्षे ३. स्नेहा राजू मेश्राम वय १२ वर्षे ४ अंकीत राजू मेश्राम वय १० वर्षे ५. चालक अक्षय उत्तम मेश्राम वय २६ वर्षे, हे जख्मी झाल्याने लोकांनी त्यांना चिमुर येथे सरकारी दवाखान्यात नेले असता,

संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांनी आजी सायत्रा मोतीराम मेश्राम, वय ६५वर्षे, रा. खापरी धर्मु. ता. चिमुर आणि आई कमला उत्तम चुनारकर, वय ५० वर्षे रा. उर्जानगर, जि. चंद्रपूर यांना मृत घोषित केले व आजोबा मोतीराम भिकारों मेश्राम, वय ७० वर्ष यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.नमुद चालक आरोपी याने आपले वाहन निष्काळजीपने व हयगयीने चालवुन मृतकाचे मरणास कारणीभुत झाल्याने व ईतर नातेवाईकांना गंभिर दुखापत होण्यास कारणीभुत झाल्याने आरोपी विरुद्ध नमुद गुन्हा दाखल करण्यात आला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, …

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved