
शांती रॅली ने परिसरातील सर्व बौद्ध विहारास दिली भेट
शेकडो नागरिकांनी भारतीय बौद्ध महा सभा तर्फे बौद्ध धम्म ची दीक्षा घेऊन महा मानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन दिले
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
(दवलामेटी प्र):-भारतीय बौद्ध महासभा तर्फे दवलामेटी , म्हाडा कॉलनी येथे शेकडो अनुयायांनी बौध्द धम्माची दीक्षा ग्रहण केली या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभे चे नागपूर जिल्हा अध्यक्ष उक्के साहेब कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी होते व त्यांनी बौध्द वंदना व बावीस प्रतिज्ञा चे वाचन करून सामूहिक रित्या अनुयायांना दीक्षा दिली. त्याचं बरोबर भारतीय बौद्ध महासभेची यशोधरा बौद्ध विहार, म्हाडा कॉलनी येथील कार्यकारणी घोषित करण्यात आली.
अध्यक्ष प्रतिभा डोंगरदिवे, उपाध्यक्ष चंद्रकला मानकर, कोषाध्यक्ष प्रतिमा मानवटकर, सचिव नरेंद्र नितनवरे, सह सचिव कुंदा थुल, संपर्कप्रमुख रमेश इंगळे, सदस्य रजत जामगडे, अक्षय वाहुळे, प्रतिभा भगत अशी नव नियुक्त कार्यकारणी घोषित करण्यात आली. प्रमुख उपस्थिती दवलामेटी ग्रामपंचायत सरपंच रीता ताई उमरेडकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत रामटेके, अध्यक्ष स्थानी जील्हा अध्यक्ष ईश्वर जी उके, चंद्र शेखर गणवीर, शिला ताई रंगारी, डी डी गजभिये, चाहांदे साहेब, रणजित राऊत ,राजेश रंगारी , नागेश बोरकर, मिना गजभिये, प्रिती वाकडे, लता नाईक,
कार्यक्रमाचे संचालन नितनवरे जी यांनी केले आभार प्रदर्शन कोरे मॅडम यांनी केले.
भव्य शांती रॅली
शांती चा संदेश देताना दवलामेटी परिसरातील उपासक उपासिकानी भव्य कँडल मार्च काढून बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. शांती रॅली मध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून रॅली परिसरातील प्रत्येक बौद्ध विहारात भेट देत, रॅली चे आरंभ व समाप्ती तक्षशिला बौद्ध विहारात करण्यात आली. शांती रॅली चे आयोजन. मुख्यध्यापक रविंद्र पाखरे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत रामटेके, प्रकाश मेश्राम, अर्चना बनसोड, शुभांगी पाखरे, कैलास बनसोड , दर्शन कुऱ्हाडे, रोहित राऊत, संदिप सुखदेवे, शैलेंद्र लामसोंगे, नितीत ढोके यांनी केले.
रॅली मध्ये श्वेता सुखदेवे, चैत्रा पाटिल, बोबडे ताई, मंगला कांबळे, आशा मेश्राम, उषा चारभे, रक्षा सुखदेवे व परिसरात महिला पुरूष मोठया संख्येने उपस्थित होते.