Breaking News

कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान

कोणत्याही अफवांवर आणि मध्यस्थांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पालकमंत्री कार्यालयात मदत कक्ष सुरू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 10 डिसेंबर : कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने 26 नोव्हेंबर रोजी प्रसारीत केला आहे. त्यानुसार संबंधित नातेवाईकास ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मात्र सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी विविध माध्यमातून अफवा पसरविण्यात येत असल्याचे तसेच काही मध्यस्थी पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर आणि मध्यस्थांवर विश्वास ठेवू नये, असे कळकळीचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरीता ही योजना आखली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना सहाय्य प्रदान करण्यासाठी आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सहाय्याची, रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने ऑनलाईन वेब पोर्टल विकसित केले असून, याद्वारे कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in यावर लॉगिन करणे आवश्यक राहील. यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पालकमंत्री संपर्क कार्यालय, नियोजन भवन, चंद्रपूर येथे मदतकक्ष सुरु करण्यात आला आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचण आहे, अशा नागरिकांचे सर्व आवश्यक कागदपत्रे स्वीकारून ऑनलाईन अर्ज भरण्यास मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी पालकमंत्री संपर्क कार्यालयातील उमेश आडे (मो. 9404235449) आणि चंद्रकांत कोटपल्लीवार (मो. 9922533445) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच सर्व तालुकास्तरावरील तहसील कार्यालयानेसुध्दा ऑनलाईन अर्ज भरण्यास नागरिकांना मदत करावी. कोरोनामुळे ज्या कुटुंबाचे छत्र हरविले आहे, असा कोणताही लाभार्थी सानुग्रह अनुदानापासून वंचित राहता कामा नये, अशा सक्त सुचना पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत.

सानुग्रह सहाय्य देण्याकरीता कोविड-19 मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यात येतील यामध्ये आरटीपीसीआर, मोलेक्यूलर टेस्ट, रॅपिड अँटीजेन टेस्ट या चाचण्यांमधून पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या व्यक्तीचे क्लिनिकल डाइग्नोसिस कोविड-19 असे झाले होते, याच व्यक्तीचे प्रकरण कोविड-19 मृत्यू प्रकरणासाठी कोविड प्रकरण म्हणून समजण्यात येईल. चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयात क्लिनिकल डाइग्नोसिसच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत मृत्यु झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला असे समजण्यात येईल. जरी हा मृत्यु रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही मदत देय आहे. कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असताना मृत्यू झालेला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोविड-19 चा मृत्यू समजण्यात येईल.

जी व्यक्ती कोविड-19 पासून बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात अथवा घरामध्ये झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे. अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल. मेडीकल सर्टिफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथमध्ये कोविड-19 मुळे मृत्यू

याप्रमाणे नोंद नसली तरीही अटीची पूर्तता होतअसल्यास ती प्रकरणे 50 हजार रुपयाच्या सानुग्रह सहाय्यासाठी पात्र असतील. यासाठी अर्जदार स्वतः, सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत सीएससी- एसपीव्ही मधून अर्ज करू शकेल.

अर्ज दाखल करताना अर्जदाराने कागदपत्रे व माहिती सादर करणे बंधनकारक :

अर्ज दाखल करताना अर्जदाराने स्वतःचा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969, खालील मृत्यू प्रमाणपत्र तसेच इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयंघोषणा पत्र देणे आवश्यक आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि उच्च शिक्षणाच मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-नेचर फाउंडेशन द्वारा नुकत्याच लागलेल्या 12 वी मधील चिमूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा …

पाच जूनला गुणवंतांचा सत्कार समारंभ

कवडू लोहकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमीत्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात वृक्ष , जल, वन्यजीव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved