Breaking News

नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 98 टक्के मतदान

• शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण
• 12 केंद्रावर 100 टक्के मतदान
• एक मतदार आयोगाकडून अपात्र
• 560 पैकी 554 मतदारांचे मतदान
• 14 डिसेंबरला मतमोजणी
• बचत भवनात स्ट्राँग रूम

प्रतिनिधी नागपूर

नागपूर दि. 10 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण 560मतदार होते. त्यापैकी 554 (98.92 टक्के) मतदारांनी सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान केले. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात आहेत. 14 डिसेंबरला बचत भवन येथे मतमोजणी होणार आहे.जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज मतदान प्रक्रीया पूर्ण झाल्यावर मतदान शांततेत पूर्ण झाल्याचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला.

 

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र प्रभाकर भोयर, अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. रात्री उशिरापर्यंत बचत भवनातील स्ट्राँग रूम मध्ये मतपेट्या जमा करण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी पुढील चार दिवस तगडा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. 14 डिसेंबरला सकाळी वाजता पासून 4 टेबलवर मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल येणे अपेक्षित आहे.

या निवडणुकीत नागपूर येथील शहर तहसिल कार्यालय, नागपूर ग्रामीण तहसिल कार्यालय, कामठी या तीन ठिकाणांना वगळता नागपूर शहरातील अन्य एक केंद्र, नरखेड, काटोल, सावनेर, रामटेक, कळमेश्वर, उमरेड, कन्हान, मौदा, बुटीबोरी, पारशिवणी,वानाडोंगरी येथील सर्व केंद्रावर 100 टक्के मतदान झाले.एकूण 560 मतदारांपैकी एका मतदाराला निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले होते. तर आज 5 मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे एकूण 554 मतदान झाले. मतदानाची एकूण टक्केवारी 98.92 आहे.

सकाळी 10 पर्यंत केवळ 2.5 टक्के मतदान झाले. दुपारी 12 पर्यंत ही टक्केवारी 25वर गेली. दुपारी 12 ते 2 ही टक्केवारी 89.10 टक्के तर शेवटच्या टप्यात ही टक्केवारी 98.92 झाली. ग्रामीण भागातही सकाळी केवळ काही ठिकाणी मतदान झाले. बहुतेक मतदान दुपारी झाले. शहर व ग्रामीण भागात या निवडणुकीसाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणतीही अनुचित घटना या कालावधीत घडलेली नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य या निवडणुकीत मतदार होते. सर्व 15 मतदार केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. मतदारांनी देखील हातमोजे, घालून मास्क लावून व थर्मल स्कॅनिंग करीत आपला मताधिकार बजावला. आवश्यकता असणाऱ्या काही केंद्रांवर व्हीलचेअर देखील उपलब्ध करण्यात आली होती.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

शेवगाव शहरात रामनवमी राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

*सकल हिंदू समाजसेवक शहर आणि तालुका यांच्या वतीने पालखीचे आयोजन ऐतिहासिक राम मंदिरात जन्मोत्सव सालाबादप्रमाणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved