
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आज दिनांक 15/12/2021 रोजी सकाळी 11/00 वाजताच्या सुमारास चिमूर पोलीस स्टेशनच्या वतीने नेरी येथील जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थींनी यांचे सहकार्यातुन बाजार चौक नेरी, P.H.C. चौक येथून प्रभात फेरी काढुण वाहतुकीचे नियमांसबंधाने नागरीकांमध्ये जनजागृती करण्याकरीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये एकुण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याकरिता विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली.
दिवसेंदिवस वाढ होत असलेल्या रस्ते अपघातांवर प्रतिबंध व्हावा या उद्देशाने पोलीस निरीक्षक मनोज गभने पो.स्टे. चिमूर यांचे संकल्पनेतुन शाळकरी मुलांच्या माध्यमातुन रॅलीचे आयोजन करण्यात आले असुन सदर रॅलीकरीता जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नेरीचे मुख्याध्यापक एस. एन. येरणे, वर्धलवार सर, एम. एम. पिसे, चाचरकर सर, मेश्राम सर, सौ. जे. एन. पिसे हजर होते.
सदरची रॅली पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, पोलीस अंमलदार भारत पुसांडे, प्रमोद पढाल, प्रमोद गुट्टे यांचे सहभागाने आयोजित करण्यात आली.