
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अभयारण्याला लागून असलेल्या चिमूर शहरामध्ये मागील २ ते ३ दिवसांपासून उप जिल्हा रुग्णालय जवळील उमा नदी लगत असलेल्या शेतातील शेतकऱ्यांना पट्टेदार वाघाचे पगमार्क शेतामध्ये दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रात्रीच्या वेळी जागल करणे फार कठीण झाले आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.
अशातच आज दिनांक.१४/१२/२०२१ ला रात्री ०९:०० वाजता च्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन उमा नदी लगतच्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरून शारदा अंबिका पॉवर प्लॅन्ट च्या दिशेने जात असतांना कार चालकांना दिसून आला याचा व्हिडीओ सुद्धा मोबाईल वर घेण्यात आला आहे. यामुळे पुन्हा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाने याकडे जातीने लक्ष देऊन या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.