
दवलामेटी ग्राम पंचायत सरपंच व पंचायत समिती सदस्य यांचा शुभ हस्ते भूमपूजन
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
दवलामेटी:-नवनवीन व भयंकर रोगांचे थैमान लक्षात घेता स्वतःचे स्वास्त, शरीर बळकट व निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे ही काळाची गरज असल्याने दवलामेटी येथिल हिल टॉप कॉलनी मधील एन आय टी गार्डन मध्ये ग्रीन जिम ची व्यवस्था करण्यात आली असून या ग्रीन जिम चे उपयोग परिसरातील नागरिकांनी करावे हि विनंती दवलामेटी ग्राम पंचायत चा सरपंच सौ रीता ताई उमरेडकर यांनी ग्रीन जिम चा भूमिपूजन प्रसंगी नागरिकांना संबोधित केले.
या ग्रीन जिम भूमी पूजन प्रसंगी प्रुमख उपस्थीती पंचायत समिती सदस्य सौ सुलोचना ढोके, ग्रा. प. सरपंच सौ रीता ताई उमरेडकर, ग्राम. प. सदस्य प्रकाश मेश्राम, सिद्धार्थ ढोके, शुभांगी पाखरे, साधना शेंद्रे, अर्चना बनसोड, रक्षा सुखदेवे, सामजिक कार्यकर्ते पूजा ताई हिवाळे, रोहित राऊत, वामनजी वाहणे, सोनू बोरकर, विक्की डाहाट व मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.