
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – दिनांक २३/१२/२०२१ ला सायंकाळी ०७:०० वा ग्राम पंचायत बीजोनी येथे गुरुदेव सेवा मंडळ तसेच पो.स्टे शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने , आझादि का अमृत महोत्सव या निमित्त अंधश्रध्दा निर्मूलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. व दिनांक.२४/१२/२०२१ ला सायंकाळी ०८:०० वा ग्राम पंचायत अर्जुनी येथे सुद्धा गुरुदेव सेवा मंडळ अर्जुनी तसेच पो.स्टे.शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रध्दा निर्मूलनाचा कार्यक्रम घेण्यात पार पडला. यावेळी अनिस चे सारंग भिमटे (चिमूर तालुका संघटक) यांनी विविध जादू चे प्रयोग करून जादू टोणा च्या नावावर सामान्य माणसाला कसे फसवले जाते हे समजावून सांगितले.
तसेच ठाणेदार मेश्राम यांनी जादूटोणा विरोधी कायद्या बद्दल माहिती दिली.तसेच दिनांक.२५/१२/२०२१ ला सायंकाळी ०८:०० वा ग्राम पंचायत दादापुर येथे गुरुदेव सेवा मंडळ दादापुर तसेच पो स्टे शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रध्दा निर्मूलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सुद्धा अनिस चे सारंग भिमटे (चिमूर तालुका संघटक) यांनी विविध जादू चे प्रयोग करून जादू टोणा च्या नावावर सामान्य माणसाला कसे फसवले जाते हे समजावून सांगितले. तसेच ठाणेदार मेश्राम यांनी जादूटोणा विरोधी कायद्या बद्दल माहिती दिली.