Breaking News

चिमूर पंचायत समिती समोर शिक्षकांचा साखळी उपोषण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्या सोडविण्यासाठी चिमूर पंचायत समिती समोर बेमुदत साखळी उपोषण दिनांक २८/१२/२०२१ सुरु
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये पंचायत समिती चिमूर अंतर्गत प्रलंबीत समस्या निकाली काढण्यासाठी संघटनेने धावार निवेदन प्रत्यक्ष भेटद्वारे पाठपुरावा करूनही प्रशासनाने हेतु पुरस्पर दुर्लक्ष केलं.

त्यामुळे दिनांक २५/११/२०२१ रोजी एकदिवसीय लाक्षणिकरणे अविलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले नसता पंचायत समिती चिमूर प्रशासनाने दुर्लक्ष केले असून शिक्षकांना मानसिक त्रासातून समोरे जावे लागत असून खूब त्रास सहन करावा लागतो . तसेच आपले कार्यालयीन पत्रानुसार १० दिवसामध्ये समस्या निकाली काढण्याचे आश्वासीत करूनही प्रलंबीत समस्यांचे निराकरण करण्यात आलेले नाही.करिता संघटने कडून समस्या निकाली काढण्याकरीता पंचायत समिती समोर उपरोक्त दिनांक २८/१२/२०२१ पासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे.

अखिल महा प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चिमुर च्या वतीने दिनांक 28/12/2021 पासून प्रलंबित समस्या करिता बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे..कालपासून जवळपास 100 संघ सैनिक उपस्थित होते.आंदोलनाची सुरवात प्रथम दिवसाचे अध्यक्ष महोदय मनोहर महाकाळकर सर यांच्या हस्ते करण्यात आले आदरणीय आचार्य दादासाहेब दोंदे यांच्या प्रतिमेचे पूजन तथा माल्यार्पण करून केले.

साखळी आंदोलनाचे प्रास्ताविक तथा सर्व समस्येचा सार तालुका शाखा सरचिटणीस ओमेश जांभुळे , सतिश डोंगरे सर व पांडुरंग भोरे सर यांनी मांडले, मनोगत सर्व भोयर सर, संगमवार सर, खानोरकर मॅडम, योगेश पावसे सर, राऊत सर लोथे सर, भुसारी मॅडम, मनोज मानकर सर तथा तालुकाध्यक्ष केळझरकर सर व इतर संघ सैनिक यांनी मांडले.

पहिल्या दिवसापासून उपोषणाचे नियोजन संघ सैनिक दंडारे सर, सुशील मसराम, चिडे सर, डुकरे सर, शेंडे सर, बगडे सर, कुबडे सर, , केंद्रे सर, वैद्य सर, पिसे सर, पराते सर, सातपुते सर, भिसे सर, शिरभय्ये सर, गिरडे सर, महाजन सर, सावरकर सर चांदेकर सर, निकोसे सर नन्नावरे सर, करमकर मॅडम, वरघने मॅडम, बावनकर मॅडम, पिसे मॅडम, कामडी मॅडम, बोकारे मॅडम व हेमलता बारमासे, यांनी केले. इतर सर्व उपस्थित संघ सैनिक यांनी उपोषण सफल होण्यास मदत केली.समस्या निकाली निघत नाही तो पर्यंत संघ सैनिक ठाण मांडून बसणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : …

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved