जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-स्थानिक आठवले समाजकार्य महाविद्यालयात गुरुवार दिनांक ३०/१२/२०२१ ला राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात विद्यार्थी व शिक्षक असे एकूण ३२ जणांनी रक्तदान केले.शिबिराचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंदनसिंग रोटेले यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. रोटेले यांनी आपल्या मार्गदर्शनातून रक्तदानाचे महत्व सांगितले, बहुसंख्य विद्यार्थ्यांना रक्तदानासाठी प्रेरीत केले.
या कार्यक्रमाला किरण रोटेले, प्राचार्या डॉ. शुभांगी वडस्कर, डॉ. चंद्रभान खंगार, डॉ. सुरेश मिलमिले, डॉ. दिवाकर कुमरे, डॉ. रागिनी मोटघरे, प्रा. वीणा काकडे, प्रा. शिल्पा गणवीर, डॉ. विलास पेटकर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे डॉ. गजानन बन्सोड, प्रा. राजू कसारे, दयानंद गावंडे यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
निखिल मेश्राम, नम्रता जांभूळे, अजय सहारे, कुणाल नन्नावरे, रोहित गेडाम, उत्कर्ष मोटघरे, चेतन बारेकर (माजी विद्यार्थी), संजय अग्रवाल, नागपूर, पायल फुलझेले, स्नेहा चंडेलकर, शार्दूल पचारे,अखिल चौधरी, आरती नन्नावरे, आशिष शेंडे, पंचशील वासनिक, संध्या मुरकुटे, कोमल वंजारी, पल्लवी ठिकरे, रुपाली धनविज, पवन चिंचुलकर,अंकित येरगुडे, भारती गायधनी, दिव्या पोटदुखे, ममता वंजारी, काजल पेंदोर, साक्षी येळणे यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व पार पाडले, सदर रक्तदान शिबीर राष्ट्रीय सेवा योजना, आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर द्वारा आयोजित करण्यात आले.