
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- आज दि.2/01/2022 रोज रविवार ला शासकीय विश्राम भवन चंद्रपूर येथे जय विदर्भ पार्टीचे राज्याध्यक्ष अरुण भाऊ केदार, महासचिव विष्णुपंत आष्टीकर,उपाध्यक्ष मुकेश मासूरकर , गुलाबराव धांदे, मारोतराव बोथले पॉलिट ब्यूरो सदस्य तात्या साहेब मत्ते, सुधा ताई पावडे, चंद्रपूर जिल्हा प्रभारी सुदाम राठोड याच्या उपस्थितीत योगेश भाऊ मूर्हेकर याची चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्तीपत्र देऊन सर्वं मताने निवड करण्यात आली.
योगेश भाऊ मूर्हेकर हे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य चे विदर्भ विभागीय कार्याध्यक्ष पदी तर युवाशक्ती ग्रामविकास संघटना महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर असून नेहमी समाज सेवेत अग्रेसर असतात. त्याची सामजिक कामाची दखल घेऊन पक्ष श्रेष्ठीनी त्याना चंद्रपूर जिल्ह्यातील जय विदर्भ पार्टीची जिम्मेदारी त्याच्यावर सोपविण्यात आली.
सभेचे आयोजन किशोर दहेकर विदर्भ राज्य आंदोलन समिती चे जिल्हाध्यक्ष यानी केले असून कार्यक्रमाचे संचालन केले.
सभेला पार्टीचे सदस्य अंकुश वाघमारे,अनिल दिकोडवार,ईश्वर सहारे, अविनाश उके, नागसेन खंदारे, भूषण चिलके, मुन्ना आवळे ,सारिका ताई उराडे, उज्वला नगराले, सुवीध्या बांबोले, प्रीती रामटेके, अर्चना सहारे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.