
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-पंचायत समिती सभागृह चिमूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर अंतर्गत स्वयंसहाय्यता समूह याचे द्वारे निर्मित विविध वस्तू तसेच वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या महिलांना स्वतः उत्पादित करीत असलेल्या वस्तुंना योग्य बाजारपेठ मिळावी व नवनवीन व्यवसाय निर्मिती व्हावी,
या उद्देशाने जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, चंद्रपूर यांचे द्वारे विपणन व मार्केटिंग या विषयावर पंचायत समिती सभागृह चिमूर येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
महिलांनी निर्माण केलेल्या वस्तूची योग्य प्रकारे प्याकेजिंग, ब्रँडिंग करून त्यांना ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यामुळे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उधोग योजनेअंतर्गत मंजूर झालेले व्यवसाय यांचे योग्य प्रकारे व्यवसाय वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने समूहातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. सद्यस्थितीत सुरू असलेल्या व्यवसायास योग्य प्रकारे बाजारपेठ मिळावी याकरिता विविध व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
सदर कार्यशाळेला प्रवीण प्रशिक्षक मोकासे सर यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस राजेश बारसागडे तालुका अभियान व्यवस्थापक उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी तालुका व्यवस्थापक मडावी सर, कु. रजनी खोब्रागडे प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर, ईश्वर मेश्राम, स्वप्ना उराडे, सारिका बाहुरे, दिपाली दोडके पशु व्यवस्थापक पुंडलिक गेडाम, किरणकुमार मेश्राम, नितेश संगेल, होमराज मेश्राम मत्स व्यवस्थापक पोईनकर, नितेश मेश्राम कृषी व्यवस्थापक कु. डोंगरे यांनी सहकार्य केलेत.