
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-केंद्रशासनाकडून देशातील संपूर्ण ग्रामीण भागामध्ये “प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान” म्हणजेच (PMGDISHA) नावाचे अभियान देशातील ग्रामीण भागामध्ये ऑगस्ट 2015 पासून राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शासकीय अनु.जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा चिमूर येथे PMG DISHA अभियान घेण्यात आले व या अभियानातून शाळेतील विद्यार्थिनींना उत्कृष्ट संगणकाचे प्रशिक्षण देण्यात आले. या अभियानाचा एकमेव उद्देश म्हणजे देशभरातील ग्रामीण भागातील सर्व नागरिक संगणकीकृत व्हावेत तसेच सर्वांना संगणकाचे ज्ञान असावे हाच एकमेव मुख्य हेतू असून त्या उद्देशाने हे अभियान राबविल्या जात आहे असं मतं केंद्रशासनाकडून व्यक्त केल्या जात आहे.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने (NSSO) 2014 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागातील केवळ 6 टक्के कुटुंबांकडे संगणक आहेत. भारतातील ग्रामीण भागातील 15 कोटी कुटुंबांकडे संगणक नाही. ग्रामीण भागातील नागरिक अल्पशिक्षित असून, अशिक्षित असल्याने संगणक वापरत नाहीत. PMGDISHA चा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना संगणक आणि इंटरनेट संबंधित प्रशिक्षण देणे आहे. ग्रामीण डिजिटल साक्षरता मोहीम 2021 द्वारे घरांमध्ये डिजिटल जागरूकता आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून देशभरात डिजिटल साक्षरता केली जात आहे.
हे प्रशिक्षण घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय 14 ते 60 वयोगटातील असावं त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थी हा भारतीय रहिवाशी असावा, आधारकार्ड, ओळखपत्र, वयाचा साक्षांकित पुरावा, आधार लिंक मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे मागितली जातात.
हे प्रशिक्षण कॉमन सर्विस सेंटर( CSC ) यांचे माध्यमातून घेतले जाते.
शासकीय अनु.जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा चिमूर येथे PMGDISHA अभियानात वयोगटात बसणाऱ्या व सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या संपूर्ण विद्यार्थिनींनी या अभियानात सहभागी झाल्या होत्या.
शासकीय अनु.जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा चिमूर येथे PMGDISHA हे अभियान दिनांक 17 डिसेंबर 2021 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत पार पडले.
या अभियानाला शासकीय अनु.जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा चिमूर येथे राबविण्यासाठी सौ. कल्पना हजारे मॅडम मुख्याध्यापक यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले असून भविष्यात देखील याप्रकारचे विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी असे अभियान व शिबीर होत राहतील अशी सकारात्मक भूमिका त्यांचेकडून ऐकावयास मिळाली. त्याचप्रमाणे शाळेतील सतीश कुकडे सर, सौ. सुनीता खोब्रागडे मॅडम, विनय खापर्डे सर, पंकज काळे सर, सौ. अनुराधा महाजन मॅडम, गभणे सर, सौ. मगरे मॅडम, सौ. रुपाली धांडे मॅडम, गजभिये सर या सर्व शिक्षकवृंद तथा कर्मचारी यांनी सुद्धा या शिबिराला सहकार्य केले असून अरविंद श्रीवास्तव सर (CSC) यांचे माध्यमातून सर्व प्रशिक्षण घेण्यात आले.