
चिमूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे फळे वाटप
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पाणसे यांच्या काल वाढदिवस होता.त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने चिमूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके,चिमूर तालुका अध्यक्ष केवलसिंग जूनी,उपाध्यक्ष दामोधर रामटेके,सहसंघटक उपक्षम रामटेके,सदस्य योगेश अगळे,सुनिल हिंगणकर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पाणसे हे उत्तम पत्रकार व कुशल संघटक आहेत.त्यांच्या शिस्तबद्ध कार्यप्रणाली नुसार पुर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा व तालुका स्तरावर कार्यकारण्या तयार करण्यात आल्या आहेत.तद्वतच प्रा.महेश पाणसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्ह्यातील जिल्हा व तालुका स्तरीय पदाधिकारी,सदस्यगण हे सातत्याने जनहितार्थ उपक्रम पार पाडीत आहेत.