
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-पद्मशाली महिला व पुरुष समाज संघटना,चिमुर च्या वतीने मार्कडेय ऋषी मंदिरात मार्कडेय जयंती निमित्त मार्कडेय महोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ पदमशाली कर्मचारी संघटना तथा जिल्हा पदमशाली समाज संघटना अध्यक्ष डॉ.बंडू आकनूरवार होते.प्रमुख अतिथी म्हणून चिमूर चे पदमशाली समाज संघटना अध्यक्ष धनंजय बिंगेवार,उपाध्यक्ष महादेव कातुलवार,सचिव राजू कुरेवार,राजू बैनलवार,यादव राचलवार,महिला अध्यक्षा सौ.कल्पना कुरेवार, सौ.सोनाली बिंगेवार,किशोर डोलेबांधे,विजय तालेवार,प्रभाकर माडेठवार , भास्कर गर्दलवार,पुरुषोत्तम येनगधलंवार,
गजानन कूडकेलवार,दिनकर आकनूरवार,मनोहर तालेवार,सौ.दीपा बैनलवार होते. सुरुवातीला मार्कडेय ऋषीची विधीवत पूजा ,अभिषेक,गायत्री यज्ञ,भजन,हळदी कुंकु, मार्कडेय जयंती निमित्त केक कापून विविध कार्यक्रम घेऊन मार्कडेय जयंती महोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी SBC 2 टक्के स्वतंत्र आरक्षण ,उच्च न्यायालयातील SBC आरक्षण केस संदर्भात व समाज संघटीत ,जागृती बाबत डॉ.बंडू आकनूरवार यांनी मार्गदर्शन केले. मार्कडेय जयंती व मधुकरराव कुडकेलवार याचं स्वर्गवास योगायोगाने एकाच दिवशी
आल्याने पुष्पा मधुकर कुडकेलवार यांनी सहभोजन व इतर खर्च करून आदर्श निर्माण केला.या महोत्सवाचे यशस्वीते साठी कुंदन माडेठवार, सुनिल बिंगेवार राजू मुळेवार,सुनिल तालेवार, प्रवीण माटेठवार,सौ.ज्योती बैनलवार ,रेखा माटेठवार व चिमुर येथील समाज बांधव ,भगिनी यांनी परिश्रम घेतले सहभोजनाने या महोत्सवाची सांगता करण्यात आली.