Breaking News

शनिवारी जिल्हयात दोन मृत्युसह 392 कोरोनामुक्त, 121 नवे बाधित

ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 1179

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 5 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 392 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 121 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर शनिवारी जिल्ह्यात दोन बाधिताचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 35, चंद्रपूर 12, बल्लारपूर 7, भद्रावती 14, ब्रह्मपुरी 7, सिंदेवाही 4, मुल 3, सावली 6, पोंभूर्णा 3, गोंडपिपरी 4, राजुरा 5, चिमूर 8, वरोरा 11, कोरपना येथे 2 रुग्ण आढळून आले असून नागभीड, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर येथील दोन पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 315 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 95 हजार 581 झाली आहे. सध्या 1179 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 51 हजार 554 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 51 हजार 461 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1555 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : …

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved