
आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान दैवत क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची विटंबना
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
दवलामेटी प्र :-दिनांक 16/2/21 ला आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान श्रध्दास्थान क्रांतीसूर्य दैवत बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अमरावती जिल्हा वरुड तालुका, उराड या गावात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा काही समाजकंटकानी विटंबना केली, बिरसा मुंडा पुतळ्याला खाली पाडले अशा हया विकृत वृत्तीच्या समाजकंटकाचा वाडी आठवामाईल येथील आदिवासी समाजबांधवानी व मनसे पदाधिकारी यांनी जाहीर निषेध केला व त्या विटंबना करणाऱ्या समाजकंटक मंदबुद्धी च्या व्यक्तीवर कठोर कार्यवाही करून शिक्षा झाली,
पाहिजे जनेकरून कोणीही अशा महान थोर पुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करतानी दहा वेळा विचार केला पाहिजे यासाठी आदिवासी समाजातील महिलांनि व पुरुषांनि तिव्र निषेध व्यक्त केला उपस्थित आदिवासी समाजाचे अध्यक्ष सौ रेखा ताई कोडापे व मनसे चे तालुका अध्यक्ष अनिल पारखी तालुका संघटक दीपक ठाकरे , दवलामेटी सर्कल सचिव सुरज भलावी, रामदास मसराम, मनीषा ओंकार तलमले , मसराम, कमल पेंदाम,सरोज धुर्वे ,मंदाताई आत्राम, सुरेखा कुंभारे उपस्थित होते.