
शेर शिवाजी संघटने तर्फे छत्रपति शिवाजी महाराज जयंती चे आयोजन क्रीडा संकुल, दवलामेटी येथे करण्यात आले
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
दवलामेटी प्र:-दवलामेटी येथील निर्माणाधिन क्रीडा संकुल परीसरात शेर शिवाजी संघटने तर्फे दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चे आयोजन करण्यात आले. या जागेवर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बरेचं दा अती क्रमनं करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्यांना आम्हीं शेर शिवाजी संघटने चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रतिकार करुण इथे क्रीडा संकुल ची मागणी धरून ठेवली व छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झंडा इथे फडकावला,
आमच्या मागणीची पुढे प्रशासनाने दखल घेऊन क्रीडा संकुल चे काम सुरु केले त्या साठी आम्हीं शेर शिवाजी संघटने तर्फे खूप खूप आभार मानतो व सर्व गावकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा असे शेर शिवाजी संघटने चे प्रमूख बाळू भाऊ इंगळकर या प्रसंगी बोलतं होते. दवलामेटी ग्रामपंचायत चा सरपंच सौ रीता ताई उमरेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमेला पुष्पहार हार अर्पण करून कार्यक्रमांची सूरवात केली.
कार्यक्रमाची प्रास्ताविक सोनुताई चुटे ,संचालन माणिकराव निकोसे व आभार प्रदर्शन बळुभाऊ उमरेडकर यांनी केले. या वेळीं सरपंच सौ रीता ताई उमरेडकर, तंटा मुक्ति अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मेश्राम, ग्राम. स. श्रीकांत रामटेके, ग्राम. स. रक्षा ताई सुखदेवे, ग्राम. स. अर्चना ताई चौधरी , ग्राम. स. शकुंतला अभ्यंकर यांची प्रमूख उपस्थिती होती.
चंद्रकांत शिंदे, मंगेश चौरपगार, नरेश मसराम, पवन धारूरकर व मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
राठी ले आऊट येथे मुख्य चौका ला मा.छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती चा शुभ मुहूर्तावर राठी ले आऊट परिसरातील मुख्य चौका ला छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नाव देण्यात आले त्या अनुसंघाने फलकाचे अनावरण प्रतिष्ठित नागरिकांच्या हसते करण्यात आले. आयोजन समिती मध्ये पीयूष लांजेवार , अनिकेत डहनकर, प्रणय डहनकर, अमन मेश्राम, आदित्य वानखेडे, प्रज्वल वानखेडे. कार्यक्रमाला प्रदीप रंगारी, विजय ढोने, सत्यपाल लांजेवार, प्रशांत खांडेकर व नागरीक उपस्थित होते.