Breaking News

शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांच्या प्रयत्नाने शेतकर्‍यांना मिळाले सौर उर्जा कुंपन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

ब्रम्हपुरी-ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडेगावातील ग्रामस्थांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकरी हे वर्षभर शेतामध्ये विविध पिकांची लागवड करून आपला उदरनिर्वाह करतात. शेतात खरीप व रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असते. त्यामुळे शेतातील उत्पादित माल जंगली वन्य प्राण्यांना खावयास मिळत असल्याने जंगली प्राण्यांचा वावर तालुक्यातील शेतशिवारात अधिक प्रमाणात होता. परिणामी, दरवर्षी शेतातील रब्बी व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यात प्रामुख्याने रानटी डुक्कर, बंदरे, सांबर, हरणे आदी.प्राणी नुकसान कारणीभूत असत. कृषी पंपाद्वारे शेतीला पाणी पुरवठा करण्याकरीता शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागते.

त्यामुळे अनेकदा जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याचे वा जीव गेल्याची घटना घडल्या आहेत. शिवाय शेतातील रब्बी पिके यात मुंग, उडीद, सोयाबीन,मका, व नगदी पिके भाजीपाला आदी़ पिकांची जंगली प्राण्यांनी नुकसान केली आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. जंगली वन्य प्राण्यांच्या शेतातील नुकसानीत पिंपळगांव, हरदोली, सावलगाव, माहेर, चिंचोली, तोरगांव खुर्द, सोंदरी, लाडज, कोथुळना, झिलबोडी, नवेगाव, परसोडी, उदापूर, पारडगांव, सोनेगाव, सावलगांव, तोरगांव बुज, नान्होरी, भालेश्वर, देऊळगाव, कोलारी, बेलगाव आदी. गावाचा समावेश आहे. त्यामुळे शेतमालांची होणारी नुकसानी पासून व वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी शासनाने मागेल त्याला सौर उर्जा कुंपन योजनेचा लाभ देण्याची मागणी

शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते यांनी म.रा. कृषी मंत्री दादाजी भुसे, उपवनरक्षक दिपेश मल्होत्रा व वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर पुनम ब्राम्हणे यांच्याकडे निवेदनातून केली होती.
सदर मागणीचा पाठपुरवठा वनविभागाने प्रशासनाकडे केल्यानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांनी केलेल्या रास्त मागणीची दखल घेत शेतकर्‍यांना ७५टक्के अनुदानावर वनविभाग ब्रम्हपुरीच्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांना १९ फेब्रुवारी २०२२पासून सौर उर्जा कुंपन योजनेचा लाभ देण्यास सुरूवात झाली आहे. या सौर उर्जा कुंपनाद्वारे शेतातील उत्पादनावर होणारे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यावर अंकुश लागणार असून शेतमालाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांच्या प्रयत्नामुळे सौर उर्जा कुंपन शेतकर्‍यांना ७५ टक्के अनुदानावर उपलब्ध झाल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकर्‍यांनी वनविभाग कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी वनपाल सेमस्कर, वनरक्षक संभाजी बलडे, वनरक्षक तोंडरे, व बगमारे यांच्या हस्ते सौर उर्जा कुंपन यंत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ. रामेश्वर राखडे उपतालुका प्रमुख शिवसेना ब्रम्हपुरी, केवळराम पारधी उपतालुका शिवसेना ब्रम्हपुरी, देवदास ठाकरे, गणेश बागडे, भाष्करजी टिकले, रामचंद्र मैंद, भाष्कर नाकतोडे माजी सरपंच, हिरालाल ठेंगरी माजी सरपंच, अनिल नंदेश्वर, जितू नंदेश्वर, किर्ती गुरनुले, भाग्यवान अलोने आदी. शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा शेवगाव वकील संघाची मागणी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव :- दि. 13 जुलै 2024 वार शनिवार (प्रतिनिधी) शेवगाव पोलीस …

फोर व्हीलर गाडी घुसली शेतात – चालकासह दोघे जण जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – नागभीड वरून चिमूर कडे येत असतांना शिरपूर नेरी मार्गावरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved