
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
दवलामेटी प्र:-अनुसूचित व नव बौद्ध घटक वस्तीचा विकास अन्तर्गत सामजिक कल्याण विभाग जिल्हापरिषद नागपूर तर्फे मंजूर झालेल्या दोन सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन जिल्हा परीषद सदस्या ममता ताई धोपटे यांचा शुभ हस्ते करण्यात आले. प्रत्येकी चार लाख पनास हजार एकुण नऊ लाख दोन रस्त्यानं साठी मंजूर झाले आहेत. वार्ड क्रमांक तीन व वार्ड क्रमांक साहा येथिल अधिक गरज असलेल्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम होणारं असून यासाठी जिल्हा परीषद सदस्या ममता ताई धोपटे यांचे पुर्ण सहकार्य लाभले असून मी त्यांचे खूप खूप आभार मानते व विकास कामांचा गतीला अधिकाधिक वेग मिळावे यासाठी आम्हीं प्रयत्नशील राहू असे या भूमिपूजन प्रसंगी सौ रीता ताई उमरेडकर यांनी माहिती दिली.
भूमिपूजन प्रसंगी अध्यक्ष स्थानी ममता ताई धोपटे व प्रमूख उपस्थिती सुलोचना ताई ढोके पंचायत समिती सदस्य गण दवलामेटी या होत्या.
दवलामेटी ग्राम पंचायत सरपंच सौ रीता ताई उमरेडकर, उपसरपंच प्रशांत भाऊ केवटे, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव नागरगोजे, ग्राम पंचायत सदस्य तसेच तंटा मुक्ति अध्यक्ष प्रकाशजी मेश्राम, ग्राम पंचायत सदस्य सिध्दार्थजी ढोके, ग्राम पंचायत सदस्य रक्षा ताई सुखदेवे हे प्रमुख आयोजक होते. इंगळकर काकु, लता नाईक, गीता मेश्राम, डी डी गजभिये, चांदेकर काका, ग्रामपंचायत कर्मचारी उमेश वाघमारे, खेमकाजि, हरले भाऊ व ईतर गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.