
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर क्रांती नगरीत महाशिवरात्री निमित्त प्रथमच शिवभक्ताचा गजर (आर्केस्ट्रा)कार्यक्रमाचे आयोजन दिनांक. १ मार्च ला सायंकाळी ०६:३० वा श्रीहरी बालाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
शिवभक्ताचा गजर या कार्यक्रमात शिव भक्तिमय गाण्याचा समावेश आहे. विदर्भातील नामवंत गीत कलावंत यांचा समावेश आहे. चिमूर येथील निखिल गटलेवार प्रस्तुत करीत आहे.या शिवभक्ताचा गजर कार्यक्रमात स्थानिक व इतरत्र जनतेनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन श्रीहरी बालाजी देवस्थान ,श्रीहरी बालाजी भक्त मंडळ व श्रीहरी बालाजी महाराज बहुउद्देशीय संस्था यांनी केले आहे.