
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील माकोना ते सावरी एक किमी अंतराचे डांबरीकरणं करण्यात आले असून सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याचा आरोप प्रहार सेवक विनोद उमरे, मुरलीधर रामटेके, मिलिंद खोब्रागडे, लोकेश खामनकर, यांनी केला आहे.
माकोना ते सावरी मार्ग खड्डेमय असून, या मार्गाने अनेक नागरिक जखमी झाले होते. त्यामुळं माकोना ते सावरी या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी प्रहार सेवक यांनी निवेदन देऊन आंदोलन सुद्धा केले होते. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने दखल घेत माकोना ते सावरी या रोडचे डांबरीकरण करण्यात आले .
सदर डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर चौकशी करुन कोटोर कारवाई करण्यात यावे.असे निकृष्ट दर्जाचे काम पास करणाऱ्या इंजिनियर वर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे मिलिंद खोब्रागडे, मुरलीधर रामटेके,लोकेश खामनकर, आझाद समाज पार्टी तालुका अध्यक्ष जेगदिश मेश्राम यांनी केली आहे .