
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक.०६/०३/२०२२ ला श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर येथे चिमूर संघर्ष साप्ताहिक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चिमूर संघर्ष या साप्ताहिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक जीवन बागडे यांनी वृत्तपत्रात काम करीत असतांना बातमीची सत्यता जाणून घेणे फार गरजेचे असते म्हणून सत्यता जाण्यासाठी संघर्ष करणे गरजेचे असते. तसेच पुरोगामी संदेश या वृत्तपत्राचे संपादक सुरेश डांगे यांनी चिमूर संघर्ष या साप्ताहिक वृत्तपत्राची प्रतिमा मलीन होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे. या ऐतिहासिक चिमूर शहराचे नाव असलेल्या या वृत्तपत्राच्या नावाला जपने गरजेचे आहे.
कुठलंही वृत्तपत्र चालवीत असतांना केवळ पैसा कमविणे हा हेतू नसावा यामुळे वृत्तपत्राचे नाव मोठे होणे कठीण असते.त्याचबरोबर ट्रि फाउंडेशन चे मनिष नाईक यांनी वृत्तपत्र चालवित असतांना संपादकीय लेख शोध बातमी तसेच विकासात्मक लेख यावर लक्ष देणे गरजेचे असते केवळ जाहिराती प्रकाशित करणे हा हेतू नसावा व लेखणीच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देणे सुद्धा गरजेचे असते असे मत व्यक्त केले. यावेळी जीवन बागडे संपादक , विनोद शर्मा कार्यकारी संपादक, माजी सरपंच मनिष नंदेश्वर, मनोहर मेश्राम, मनिष नाईक ट्रि फाउंडेशन , रामनिवास शर्मा कपडा व्यापारी , राजू देवतळे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा, सुरेश डांगे संपादक ,सुधीर पंदीलवार काँग्रेस कार्यकर्ते , जावेद पठाण, सुनील हिंगणकर, संजय नागदेवते, जयंता कामडी, जितेंद्र घाडगे,रामदास ठुसे,रमेश खेरे राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल तालुका अध्यक्ष,विलास मोहिनकर तालुका सरचिटणीस काँग्रेस, संदीप कावरे अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर विधानसभा ,व आदींची उपस्थिती होती.