
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-प्राप्त माहितीनुसार मौजा शिवनपायली येथील अल्पवयीन पिडीता नेहमीप्रमाणे चिमूर येथे सायकलने कॉलेजला जाऊन नेरी येथे परत येत होती. वाटेत आरोपी वैभव नाकाडे यांनी दि. 7 मार्च ला सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास सदर मुलीचा मोटार सायकलने पाठलाग केला. मोटार सायकल व पिडीतेची सायकल बरोबरीत आणून डाव्या हाताने पिडीतेची कंबर पकडली, पिडीतेच्या सायकलचा हँडल फिरवून पिडीतेस जमीनीवर पाडले. सायकल पडल्यामुळे पिडीतेच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर पिडीता ‘ मम्मी… मम्मी…असे ओरडत धावत सुटली. मागे आरोपीने आपली मोटार सायकल रस्त्यावर ठेवून तिचा पाठलाग केला व पाठीमागून पिडीतेस पकडून तिचे तोंड दाबून रोडच्या बाजूला नेऊन विनयभंग केला.
या प्रकरणाची तक्रार पिडीत युवतीने चिमूर ठाण्यात दिल्यानंतर तपास यंत्रणा वेगाने फिरवून आरोपीस तपासाअंती गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीस अटक केली. आरोपीविरुद्ध अप.क्र. 81/ 2022 कलम 341, 354, 354 (ब) 354 (ड (1) 336, 337, भांदवी सहकलम 8 ले.अ. बा.सं अधी, 2012 सह कलम, 3 (1) (डब्लु ) (आय) (आय आय) 3 (2) (व्हीए) अ.जा.ज.अ.प्र.का. सुधारित अधिनियम 2015 नुसार गुन्हा दाखल केला.
पुढील तपास चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगडे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार मनोज गभने, आलीम शेख पो. उपनिरीक्षक, मंगेश मोहोड सहा. पोलिस निरीक्षक व त्यांची टिम करित आहे. या घटनेमुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.