
प्रतिनिधी नागपूर
नागपूर :- काही महिन्यांपूर्वी एका हॉस्पिटलच्या आवारामध्ये अर्भकाच्या कवट्या आणि हाडे सापडली होती अजूनही त्या प्रकरणाचा तपास सुरूच असून अशातच नागपूरातील लकडगंज परिसरामध्ये कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पाच अर्भक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशा घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील लकडगंज भागात ही घटना उघडकीस आली आहे. केटी वाईन शॉपजवळील कचरा डंपिंग यार्डमध्ये बुधवारी सायंकाळी पाच अर्भकं आढळली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही स्थानिकांनी ही अर्भक दिसले आणि त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. सूचनांवर त्वरीत कारवाई करत लकडगंज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एकूण पाच अर्भक असल्याचे सांगितले आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पाचही अर्भक ताब्यात घेतले आहे. हे पाच अर्भक कुणी आणि का टाकले? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
आर्वीच्या कदम हॉस्पिटल प्रकरणाची आठवण दरम्यान, जानेवारी महिन्यात वर्ध्यातील आर्वीमध्ये असाच प्रकार समोर आला होता. आर्वीतील कदम रुग्णालयाच्या परिसरात ११ मानवी कवट्या आणि ५४ अवशेष जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. ५ जानेवारी रोजी एका १३ वर्षीय मुलीचा डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयात गर्भपात करण्यात आला होता.अधिकचे पैसे आकारून एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची तक्रार आर्वी पोलिसात देण्यात आली होती. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदम हिला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पथकाने तपासणी केली असता समोर आलेले दृश्य भयावह होते. पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस तपासणी केली असता गोबरगॅस चेंबरमध्ये भ्रूण आणि हाडांचे काही अवशेष सापडले होते. या प्रकरणी डॉक्टर कदम यांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.