
अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे कोरोना योद्धा प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित.
नागेश बोरकर / दवलामेटी प्रतिनिधी
नागपूर – वंचित बहुजन महीला आघाडी नागपूर ग्रामीण जिल्हा कमेटितील माधुरी ताई खोब्रागडे यांचा मार्गदर्शनात दारु भट्टी हटाव समिती गठीत झाली असून, महीला दिनाचा शुभ प्रसंगी दारू भट्टी बंद करण्याचा निर्णय यावेळी सर्व संमतीने दवलामेटी तील महिलांनी घेतला.
वंचित बहुजन आघाडी दवलामेटी तर्फे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी साठी आयोजित कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, मदत नीस यांचा कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
परिसरातील दारु भट्टी मुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले , ईतर अनेक गुन्हे करतांना ९०% आरोपी हा दारु चा नशेत असतो तसेच या दारु भट्टी ला लागून इन्फंट स्कूल व सरोजनी पब्लिक स्कूल आहे शिवाय काहीच अंतरावर बौद्ध विहार व चर्च पण आहे. म्हणजेच दारुभट्टी पासून काही मीटर अंतरावर शाळा व धार्मिक स्थळे असल्याने इथे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी धोका दायक आहे. म्हणूनच ही दारू भट्टी हटवण्या साठी आज माहीला दिना निमित्त महिलांनी एकत्र येऊन लढा सुरू केला पाहिजे असे मत आपल्या भाषणांतून मांडताना माधुरी ताई वंचित बहुजन महिला आघाडी नागपूर जिल्हा कमेटी चा माधुरी ताई खोब्रागडे बोलतं होत्या.
अम्हा अंगणवाडीसेविका, मदत निस व आशा वर्कर चा कोरोना काळातील कार्याची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडी पक्षाने आमचा सन्मान केल्याबद्दल आम्हीं सामूहिक रित्या वंचित बहुजन आघाडी शाखा दवलामेटीचे खूप खूप आभार मानतो असे अंगणवाडी सेविका उषा चारभे बोलतं होत्या.
कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विलास भाऊ वाटकर, माधुरी ताई खोब्रागडे, सरपंच सौ रीता ताई उमरेडकर , तंटामुक्ति अध्यक्ष व वरिष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मेश्राम, श्रीकांत रामटेके, साधना शेंद्रे, शुभांगी पाखरे यांची प्रमुखं उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन मुख्यध्यापक रविन्द्र पाखरे, प्रस्तावना सोनु बोरकर व आभार प्रदर्शन प्रविण अंबादे, यांनी मानले.
यावेळी शाखा अध्यक्ष दीपक कोरे, युवा आघाडी सचिव पंकज कंगाले, शाखा संघटक रोहित राऊत, सह सचिव प्रवीण अंबादे, कोषाध्यक्ष स्वप्नील चारभे, मधूकर गजभिये, वामन वाहने, नाना मेश्राम, नरेश गवई , दिगांबर जांभूळकर प्रमुख आयोजक कमेटीत होते.
लता सोमकुवर, रेखा बोदलकर, प्रीती वाकडे, उषा चारभे , नलू मेश्राम, लता महेस्कर, महानंदा राऊत, निमसरकार ताई, माला राऊत, जोस्तना बेले, साधना गजभिये, प्रज्ञा लोखंडे, जाधव ताई, माधवी फुलझेले व मोठ्या संखेने अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस व परिसराती महीला, पुरुष, युवक उपस्थित होते.