Breaking News

व्हॉलीबॉल प्रशिक्षणासाठी निवड चाचणी 24 मार्च रोजी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 23 मार्च : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत खेळाडू शोध मोहीम प्रक्रियेतून एप्रिल किंवा मे महिन्यात 16 वर्षांखालील मुलांचे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबिर शिवछत्रपती क्रीडा संकूल पुणे येथे आयोजित असून 20 दिवसांचे राहणार आहे. यात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी.पंडीयन यांच्याकडून खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाईल.

या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पाच खेळाडू निवडायचे असून त्यांची जन्मतारीख 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षांखालील तर उंची सहा फुट असावी. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी चंद्रपूर येथे निवडचाचणी 24 मार्च 2022 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकूल, आकाशवाणी रोड येथे होणार आहे. अधिक माहितीकरीता व्हॉलीबॉलचे राज्‍य क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके (मो. 9975862469) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वनविभागाची रेती माफियांवर धडक कारवाई – अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त

  अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात रेती माफिया …

13 फेब्रुवारी रोजी आयटीआय मधील निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी येथील विविध व्यवसायातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved