
गोसे कालव्याच्या कामावरील ओ.एस.एस.प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ३ हायवास विना परवाना रात्रीच्या अंधारात मुरूमाची वाहतूक करतांना महसूल पथकाने पकडले
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर तालुक्यात अवैधरीत्या रेती व मूरूम उत्खनन सुरू असतांना काही दिवसांपूर्वी ७ ते ८ ट्रॅक्टरवर अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असतांना चिमूर तहसीलच्या महसूल पथकाने तहसीलदार बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथक प्रमुख उमाटे, अमोल घाटे, प्रवीण मेहरकुरे ,प्रवीण ठोंबरे, आकाश तुरारे ,रितेश आमटे, व विनोद गजभे कोतवाल या पथकाने सापडा रचून हि कारवाई केली.तशीच पुन्हा एकदा २३/०३/२०२२ ला गोपनीय माहितीच्या आधारे रात्रीच्या अंधारात सापडा रचून गोसे कालव्याच्या कामावरील नामांकित ओ.एस.एस. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ३ हायवास विना परवाना मुरूमाची वाहतूक करतांना पकडण्यात आले आहे, आणि १८ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.हि चिमूर तहसील ची आजपर्यंत ची सर्वांत मोठी कारवाई असून या महसूल पथकाची सध्या तालुक्यात चर्चा रंगली आहे.