
जिल्हा अध्यक्षा सौ.स्वातीताई धोटकर यांची प्रमुख उपस्थिती
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक.६ एप्रिल २०२२ रोजी चिमुर तालुका काँग्रेस पर्यावरण विभाग कमेटीची बैठक डॉ.सतिशभाऊ वारजुकर यांच्या तालुका काँग्रेस कार्यलय चिमुर येथील ( वडाळा पैकू ) येथे घेण्यात आली. चिमुर तालुक्यातील पर्यावरण परिस्थितीवर मात करण्यासाठी आढावा म्हणून हि बैठक जिल्हाअध्यक्षा सौ.स्वातीताई धोटकर यांचे उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी महिलांना रोजगाराच्या संधी कशाप्रकारे उपलब्ध करून देता येईल. तसेच काँग्रेस पक्ष वाढीसाठी सुद्धा जोमाने कामास लागावे तसेच विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी तालुका काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप तळवेकर , शहर अध्यक्ष अविनाश अगडे, मिडीया प्रमुख पप्पुभाई शेख, तालुका महिला अध्यक्षा सौ.सविताताई चौधरी, शहर महिला अध्यक्षा रानीताई थुटे, जिल्हा महासचिव युवक काँग्रेस गौतम पाटील, विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे, तालुका उपाध्यक्ष राजु चौधरी, विलास मोहिनकर तालुका काँग्रेस सरचिटणीस, सौ.गीताताई रानडे महिला सरचिटणीस , नाजेमा पठाण महिला कांग्रेस अध्यक्षा अल्पसंख्याक विभाग , शहेनाज आंसारी उपाध्यक्षा अल्पसंख्याक विभाग, वैशालीताई शेंडे तालुका युवती अध्यक्षा, महिला कांग्रेस सदस्या दिक्षाताई भगत , सौ.ममताताई भिमटे , संघटक सचिव तालुका महिला काँग्रेस , प्रवीण जिवतोडे माजी महासचिव विधानसभा युवक काँग्रेस अमित मेश्राम माजी तालुका महासचिव , प्रमोद दाभेकर खडसंगी पं. स. सर्कल प्रमुख , आकाश श्रीरामे मुरपार पं. स.सर्कल प्रमुख इत्यादी उपस्थित होते.