
चिमूर तालुका कांग्रेस पर्यावरण विभागाचे प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा दिला इशारा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- आज दि. 8 एप्रिल 2022 रोजी चिमूर तालुका कांग्रेस कमेटी, पर्यावरण विभाग यांच्या तर्फे चिमूर उपविभागीय अधिकारी श्रीमती प्राजक्ता बुरांडे तहसीलदार मॅडम यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनामध्ये चिमूर नगर परिषद क्षेत्रातील चावळी मोहल्ला लगत चिमूर येथील वस्तीलगत उमा नदीकाठावर बऱ्याच वर्षांपासून घन-कचरा साठविण्यासाचे काम सुरू आहे.अलीकडे शहरापासुन काही अंतरावर डम्पिंग यार्डमध्ये साठवणूक करून विल्हेवाट केल्या जात आहे.
ही वस्तुस्थिती आहे.मात्र महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच वर्षांपासून चावळी मोहल्ला येथे वस्तीलगत टाकलेल्या घन-कचऱ्याचे कुठल्याही प्रकारची विगल्हेवाट न लावल्यामुळे अतिशय दुर्गंधी सुटलेली असुन रस्त्यावर ये-जा करणाऱ्या जण सामान्यांना व लगतच्या परिसरातील वास्तव्याने असलेल्या नागरिकांना ह्या घाणीचे व घाणीपासून सुटलेल्या दुर्गनधाचा ना-हक त्रास सहन करावा लागतो आहे.ही वस्तुस्थिती आहे. करिता या घन-कचराकडे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष्य देऊन तेथील घन-कचरा साफ करावे अन्यथा पर्यावरण विभागाचे वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी तालुका कांग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप तळवेकर,तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष संजय घुटके , शहर कांग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे, शहर मिडीया प्रमुख पप्पुभाई शेख, विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे, महिला अल्पसंख्याक सेलचे अध्यक्षा नाजेमा पठाण, उपाध्यक्षा शहेनाज आंसारी , आकाश श्रीरामे मुरपार पं. स.सर्कल प्रमुख व इत्यादी उपस्थित होते