
पोलिस प्रशासन करीत आहे दुर्लक्ष
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोकप्रिय असलेली बैलगाड़ी शर्यत अर्थात शंकरपट आता पुंन्हा सुरु झाली आहे, केंद्र सरकार ने या खेळाला सशर्त मंजूरी दिल्याने शंकरपट प्रेमिनी त्यांचे स्वागत केले आहे. पन शंकरपटाच्या नावाखाली लाखो रुपयांचा झेंडा मुंडी तीन पत्ती चा लाखो रुपयांचा जुगार भरवील्या जात आहे, या कड़े मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे,
चिमुर तालुक्यातील नेरी लगत लागून असलेल्या आणि चिमूर तालुक्यातील चर्चित असलेल्या खुटाळा येथे दिनांक २० मार्च पासून भव्य बैल जोडी शंकरपट सुरु झाला असून शंकरपटाच्या नावाखाली दररोज लाखो रूपयाचा जुगार या ठिकाणी खेळला जात आहे, केंद्र सरकार शेतकरी व पटप्रेमी बंधूंची मागणीला विचार करून पारंपरिक खेळ शंकरपटला सशर्त परवानगी दिली त्यामुळे शेतकरयामधे व पट शौकीन लोकांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे खेड्या पाड्यात शंकरपट भरन्यास सुरुवात झाली आहे.मात्र शंकरपट च्या नावाखाली रोज लाखो रूप्याचा जुगार या ठिकाणी खुलेआम खेळला जातो,
यामुळे ग्रामीण भागातील गरीब गरजू वेक्तीला व्यसन लागून हजारो रुपयांची उधळण केल्या जात आहे.मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस प्रश्नाचे दुर्लक्ष असल्याने विभाग जाणून तरी सुधा पोलिस प्रशासन या कड़े जनिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे?की काही माहिती नाही या रोज होत असलेल्या खुलेआम झेंडा मुंडी,तीन पत्ती खेळाला परवानगी देण्यात आली यात काही प्रमाणात गौडबंगाल तर नाही ना /अशी शंका पटप्रेमी करीत आहेत,पटावरील खऱ्या पटप्रेमी मात्र असल्या खेळा मुळे नाराज असून शँकरपटला मीळलेली परवानगी वर सुद्धा परिणाम पडू शकते त्या मुळे पट कमिटी यांनी याची दखल घेऊन असल्या जुगाराला बंद करण्यात आवे अशी मागणी खऱ्या पटप्रेमी बंधूनी केली आहे