
श्री श्री साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बुट्टीबोरी, प्ररव मेडिकल, गुरुदेव सेवा मंडळ, गाडगे महाराज युवा मंच यांचे संयुक्त आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी पासून जवळ असलेल्या मोटेगाव येथे 24 एप्रिल, रविवारला सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मोफत आरोग्य निदान शिबीराचे आयोजन श्री श्री साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बुट्टीबोरी, प्ररव मेडिकल, गुरुदेव सेवा मंडळ, गाडगे महाराज युवा मंच यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.प्ररव मेडिकल (चंदुजी रामटेके यांची चाळ), बाजार चौक, मोटेगाव येथे सदर शिबीर संपन्न होणार आहे.
या आरोग्य निदान शिबीरामध्ये नामवंत चिकीत्सक, तज्ञ डॉक्टरांची पुढीलप्रमाणे चमू येत आहे.
१. डॉ. के. आय. नागदेवते, जनरल फिजिशीयन, नागपूर
२. डॉ. प्रणव मासटवार, अस्थिरोग तज्ञ, नागपूर
३. डॉ. सत्येन्द्र वऱ्हाडे, नागपूर
४. डॉ. आटे. क्ष-किरण तज्ञ, नागपूर
५. डॉ. कांबळे, जनरल सर्जन, नागपूर
६. डॉ. पान्हेकर, बालरोग तज्ञ, नागपूर ७. डॉ. विपिन आत्राम, मुळव्याध सर्जन, नागपूर
८. डॉ. इंद्रजित नागदेवते, ह्दयरोग व मधुमेह तज्ञ, गडचिरोली
९. डॉ. निलकंठ मसराम, क्ष-किरण तज्ञ, गडचिरोली
१०. डॉ. निकेश खोब्रागडे, जनरल सर्जन (स्पर्श हॉस्पीटल) ब्रम्हपुरी
११. डॉ. कैलास नगराळे, दंतरोग तज्ञ, गडचिरोली १२. डॉ. बालु सहारे, अस्थिरोग तज्ञ, (नोबेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल), गडचिरोली
| १३. डॉ. प्रफुल वाळके, दंतरोग तज्ञ, गडचिरोली
१४. डॉ. तारकेश्वर उईके, बालरोग तज्ञ, गडचिरोली १५. डॉ. मिलींद रामटेके, बालरोग तज्ञ, गडचिरोली
१६. डॉ. दुर्गे, जनरल सर्जन, गडचिरोली,डॉ. महेश खानेकर चर्मरोग तज्ञ चिमुर
या आरोग्य शिबीरामध्ये मोफत रक्त तपासणी, इ.सी.जी., वातरोग, मुळव्याध, बालरोग, दंतरोग, हृदयरोग व मधुमेह इत्यादी तपासणी केली जाणार आहे.डॉ. रवि नागदेवते यांचेकडे 9689399054 या नंबरवर शिबिराचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी, समस्त नागरीकांनी आपल्या आरोग्य विषयीच्या समस्यांची योग्य चिकीत्सा करून आरोग्याचे निदान करून घेण्यासाठी आरोग्य शिबीरात हजर राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.