
* मृतदेह बसल्या अवस्थेत, सोबत सापडली दारु ची बॉटल!
* दारु ने घेतला असेल पुन्हा एक बळी! चर्चेला उधाण!
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी(प्र):-दत्तवाडी च्या अत्यन्त वर्दळी च्या दत्ता संकुल समोर सोमवारी सकाळी बसल्या स्थितीत दिसून आल्याने आस पासच्या नागरिकांत खळबळ उडाली.प्रत्यक्ष दर्शी व वाडी पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार दत्ता व्यावसायिक इमारतीत वर चढण्याच्या पायरी शेजारी एक व्यक्ती कित्येक वेळेपासून खाली मान टाकून स्तब्ध अवस्थेत बसून होता. सकाळी बस स्टॉप वर व पोहा स्टॉल वर नागरिकांची गर्दी असूनही सुरवातीला कुणी लक्ष दिले नाही.
मात्र त्याच्या हाताला लागलेली जखम व कोणतीही हालचाल नसल्याने नागरिकांना शंका आली. वाडी चे पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार याना घटनेची सूचना मिळताच त्यांनी पोलीस दल घटना स्थळी पाठविले. वाडी नगर परिषदेचे स्वछता लिपिक रमेश कोकाटे हे देखील पोलिसांसोबत घटनास्थली दाखल झाले.
पाहणी केली असता सदर इसम मृत्यू स्थितीत दिसून आला. त्याच्या नाकातून रक्त वाहत होते. त्याच्या कडे कोणतेही ओळख पत्र नव्हते. मात्र काही रोख व 1 छोटी दारूची बॉटल सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. ही सूचना प्रसारित होताच नागरिकांची मोठी भीड जमा झाली. दरम्यान कुणी तरी या इसमाला ओळखले व त्यांनी मृतकाच्या सुरक्षा नगर येथील घरी सुचना देताच मृतकाचे वडील घटनास्थळी पोहचुन ओळख पटवली. वाडी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नागपूर मेओला रवाना केला.
मृतकाचे नाव राकेश वीरेंद्र प्रसाद चौबे वय 46 ,रा.प्लॉट क्र.56 सुरक्षा नगर असून तो जय ग्लोबल नामक कम्पणीच्या सुरक्षा रक्षक म्हणुन कार्यरत होता. कुटुंबाच्या माहिती नुसार त्याला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी , ड्युटी च्या कारणाने घरून गायब राहायचा. आता ही तो 7 मे पासून घरी नव्हता त्या मुळे घरच्यांनी नेहमी प्रमाणे शोध घेतला नाही. दारु मुळेच मृत्यू झाला असेल अशी चर्चा सर्विकडे पसरली असून. मृतकाचे वडील विरेंद्र प्रसाद चौबे वय 68 यांच्या माहिती व सूचनेवरून वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू ची तक्रार दाखल करून घेतली आहे.पोलीस कर्मचारी गोविंद मांडवगडे यांनी दिवसभर या प्रकरणाचा तपास केला.पोस्ट मार्टम अहवाला नंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल अशी माहिती द्वितीय पोलीस निरीक्षक गोडबोले यांनी दिली.