
राज ठाकरे व रामदास आठवले महाराष्ट्राचे कॉमेडियन नेते असे मी मानतो – विजय मानकर
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी:- इ व्ही एम मशीन बॅन करण्यासाठी संसदेत काँगेस ने बिल सादर करावे आवश्यकता असेल तर मी मुद्दे सुद पने बिल तयार करून देण्यास तयार आहे. महाराष्ट्रातील राज ठाकरे व रामदास आठवले मी यांना कॉमेडियन नेते मानतो. २०२४ चा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मला माझा पक्षाला अधिका अधिक मताधिक्याने निवडून आना असे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रिय अध्यक्ष विजय मानकर यांनी जाहीर सभेला संबोधित करताना सांगीतले.
येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता नागपूर ग्रामीण येथील दवलामेटी मध्ये आबेडकराईट पार्टी ची जाहिर सभा बुधवार ला संपन्न झाली सभेला पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष विजय मानकर हे अध्यक्ष स्थानी होतें.
कार्यक्रमाचे आयोजन कैलास बनसोड, संदीप जनबंधू, , देवेंद्र कांबळे, शुभम भालाधरे, सौरभ खेडकर, दीपक बिसेन, संजय तांबेकर, आकाश चौहान यांनी केले तर गोंडवाना चे महान प्रवर्तक व एपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष हे अध्यक्ष स्थानी होतें तसेच प्रमोद बनसोड, त्रिशिल खोब्रागडे, रामटेक लोकसभा प्रभारी अशोक रामटेके, केवलदास टेंभेकर , यशवंत तेलंग, डॉ. पारस शंभरकर, देविदास रायबोले, योगेश ठाकरे प्रमोद खोब्रागडे, मुन्ना मांनवटकर प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक रविन्द्र पाखारे यांनी केले.