Breaking News

अमरावती महामार्गावर स्कार्पिओ ला थांबवून युवकांनी केली 92 हजारांची लूट

वाडी पोलिसांच्या तत्परतेने ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी

दवलामेटी (प्र):-वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत अमरावती मार्ग आठवा मैल पावर हाऊस जवळ शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास हॉटेल मध्ये जेवण करायला जात असताना स्कार्पिओ गाडीत बसलेल्या परिवाराला अडवून आरोपींनी त्यांच्या जवळून ९२ हजाराची लुट केल्याची घटना उघडकीस आली. वाडी पोलिसांनी जारी केलेली प्रेस पत्रानुसार फिर्यादी नुरान नजीर खान वय-३७ वर्षे रा.२०/०१, बिनाकी ले-आउट,वैशाली नगर,पाचपावली हे आपल्याा परिवारासह राजकमल हॉटेल अमरावती रोड येथे जेवण करन्या करिता आपली स्कॉर्पिओ वाहन क्रं.MH02 DW 0330 ने जेवण करून परत नागपूरला परत येत असताना दोन मोटर सायकल वर आलेले सहा अनोळखी आरोपींनी त्यांचा पाठलाग केला व पावर हाऊस जवळ दुचाकी वाहन फिर्यादीच्या समोर आणून उभे केले व बाचाबाची-शिवीगाळ करून फिर्यादीचे गाडीला दगड मारून काच फोडले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर आरोपींनी नुरान नजीर खान वय-३७ वर्षे,कलाम शेख चांद शेख वय-५८ वर्षे, रमेश खान मजर जमील खान वय-२६ वर्षे यांना दगडानेे व हात बुक्की ने जबर मारहाण करून जखमी केले.

 

यासह फिर्यादीच्या साडू च्या खिशातील ११ हजार रुपये
रोख व सासऱ्यांचा विवो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे ५ हजार रुपये व फिर्यादीचे सासूच्या गळ्यातील २ तोळ्याचे सोन्याची चैन किंमत अंदाजे ७० हजार रुपये व लेडीज पर्स ज्यामध्ये ६ हजार रुपये रोख होते असा एकूण ९२ हजार रुपयांचा ऐवज लुटून पसार झाले.
दरम्यान याच वेळी वाडी पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग करणारी गाडी फिरतीवर असताना त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी उपस्थित महिलांना याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सर्व हकीकत बयान केली.लगेच वाडी पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला व यापैकी एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले आरोपीला घेऊन वाडी पोलीस स्टेशनला आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व हकीकत बयान केली,

अवघ्या ६ तासाच्या आत
आरोपीं १) निखिल हौसलाल चौधरी वय-२४ वर्ष रा. प्लॉट नं.९६ शाहू ले-आऊट दत्तवाडी,
२) अंकुश विलास माडेकर वय-१९ वर्ष रा.प्लॉट नं.३८ रा. शुभारंभ सोसायटी,दत्तवाडी,
३) अष्लेश सुनील जलहालीकर वय – २१ वर्ष रा.प्लॉट नं.डी-५०६ कृष्णा निसर्ग अपार्टमेंट,राजीव नगर,हिंगणा
४) आदित्य शेषराव राऊत वय-२२ वर्ष रा. प्लॉट नं.२४ स्मूर्ती ले-आउट दत्तवाडी,
५) अमर ज्ञानेश्वर खरजे वय-२३ वर्षे रा. तामिळनाडू ट्रान्सपोर्ट च्या मागे प्लॉट नं.२५ शिवाजी नगर,वडधामना
६) शैलेश कैलास बागडे वय-२२ वर्ष रा. नामदेव लाॅन शेजारी दौलतवाडी शाहू यांचे घरी किरायाने
एखाद्या इत्यादी आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.

सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे,अप्पर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे मार्गदर्शनात वाडीचे वरिष्ठ पो.नि.प्रदीप रायण्णावार,पो.नि. विनोद गोडबोले,सपोनि ज्ञानेश्वर ढवळे,दत्ता पेंडकर,गणेश मुंढे इत्यादींनी केली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्पर कार्यवाहिने लवकरच सहाही आरोपी वाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. वाडी पोलिसांनी आरोपींवर कलम ३९७,४२७,५०४,५०६ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाडी पोलीस तपास करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संकटात सापडलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले चंद्रपूरचे प्रकल्प कार्यालय

एक लक्ष रुपयांची तात्काळ मदत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमुळे बकऱ्या …

जिल्हा परिषदेच्या 24 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत एकूण 24 जिल्हा परिषद शाळांत सेमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved