
शोध मोहिमेनंतर एकोणवीस तासांनी वनविभागाला मिळाले यश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील मौजा केवाडा येथील पती विकास जाभुळकर व पत्नी मिना जाभुळकर हे दोघेही पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळच्या सुमारास केवाडा-गोंदेडा वनपरीसरात तेंदुपत्ता तोडण्याकरीता गेले असता तबा धरून असलेल्या वाघाने दोघावरही हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, पत्नी मिनाचा मृत्यू देह मिळाला आहे, जखमी अवस्थेत असलेल्या विकास या॓ची जंगल परीसरात वनविभागाची शोधमोहीम चालु होती काल वन विभागास तात्कालीन माहीती देऊनही तब्बल दोन तासा नंतर वन विभाग अधिकारी घटनास्थळी पोहचल्याची माहिती केवाडा वासीय जनतेनी दिली होती अखेर 19 तासान॔तर पती विकासला शोधण्यात वनविभागाला यश आले असुन केवाडा- गोंदोडा परीसरातच डोगराच्या पायथ्याशी जखमी अवस्थेत मिळाले असुन पुढील उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय चिमूर येथे रेफर करण्यात आले असल्याची प्राप्त माहिती मिळाली असून पुढील तपास वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत.