
अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा
मुख्याधिकारी यांना दिले निवेदन – माजी नगरसेवक उमेश हिंगे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- चिमूर नगर परिषद क्षेत्रातील संपूर्ण नाल्या तुडुंब भरलेल्या असून त्या ताबड़तोड़ उपसा करण्यात यावा असे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद चिमूर यांना देण्यात आले असून तसेच नालीतील गाळ उपसा न झाल्यास अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला आहे,
चिमूर नगर परिषद क्षेत्रातील नालीचा गाळ उपसा मागील एक वर्षापासून झालेला नाही, त्यामुळे संपूर्ण नालीमध्ये गाळ साचुन नाल्या तूडुब भरल्या आहेत, त्यामुळे शहरात आरोग्याच्या व डासाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, अवघ्या काही दिवसात पावसाला सुरुवात होत असून पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, दिनांक 7 जून पर्यंत नालीचा उपसा झाला नाही तर नगरपरिषद समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी निवेदना द्वारा माजी नगरसेवक उमेश हिंगे यांनी दिला आहे.