
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
नेरी:-ग्राम पंचायत नेरी येथील अतिक्रमण काढण्यासाठी सरपंच यांचे आदेशानुसार कर्मचारी व मजूर गेले असता प्रस्तावित कृषी केंद्र दुकानदार प्रफुल गुलाब वाघमारे यांचा मोठा भाऊ गुणवंत गुलाब वाघमारे याने मजुरास मारहाण केल्याची घटना दि 2 जून ला घडली असून प्रकरण पोलिसात गेल्याने गैरअर्जदार वर ३२३,५०४ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुणवंत गुलाब वाघमारे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे
सविस्तर असे की ग्राम पंचायत नेरी येथील बाजारपेठेत प्रस्तावित कृषी केंद्र दुकान हे प्रफुल गुलाब वाघमारे यांचे असून दुकानाची शिडी रस्त्याच्या नाली वर असल्याने सरपंच यांनी कर्मचारी यांना अतिक्रमण काढण्याची सूचना केली असता कर्मचारी यांनी मजुरांना घेऊन त्या ठिकाणी गेले. तेव्हा गुणवंत गुलाब वाघमारे यांनी मजुराना तु काढणारा कोण होते ? असे म्हणून शिवीगाळ करीन हाताने गालावर मारून मारहाण केली. तेव्हा फिर्यादी मजूर दामोदर ननावरे यांनी तक्रार द्यायसाठी नेरी पोलीस चौकी गाढली असता नागरीकानी चौकीमध्ये एकच गर्दी केली होती. वातावरणाचा तनाव निर्माण झाला होता.ह्या सर्व बाबीची माहीती होताच ताबळतोब घटनास्थळी ठाणेदार गभने यांनी भेट दिली.
स्पाट चौकशी करून गुणवंत गुलाब वाघमारे रा. पांढरवाणी यांचे वर भारतीय दंड संहिता ३२३ व ५०४ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत. सदर हा प्रकार नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळले नसुन नेरी शहरात पहील्या॓दाच ग्रामपंचायत कर्मचार्याला मारहान झाल्याचे समजले आहे. वाघमारे वर्सेस नेरी ग्रामपंचायत यांच्यात तनावाचे वातावरण निर्माण झाले असुन मोठा वाद पेटण्ची शक्यता आहे.