
अंतिम सुनावणी पर्यंत चार ही ग्रामपंचायत सदस्य पूर्व पदावर रुजू
प्रतिनिधी नागेश बोरकर
दवलामेटी प्र:-शासकिय जागेवर अतिक्रमण आरोपाखाली अपर जिल्हाधिकारी मा. शिरीष पांडे यांनी दवलामेटी ग्राम पंचायत च्यां चार सदस्या वर निलंबन आदेश दिला होता. या आदेशावर चारही ग्राम पंचायत सदस्यांनी स्टे उपायुक्त मां. ढीवरे साहेबा तर्फे मिळवला नंतर ढीवरे साहेबां चा जागेवर सौ. माधवी चौरे मॅडम रूजू झाल्या व त्यांनी अपर जिल्हाधिकारी शिरिष पांडे यांचा चार हि ग्राम पंचायत सदस्य पद बरखास्त चा आदेश कायम ठेवला होता. १७/०५/२०२२ चा अपर आयुक्त नागपुर यांचा आदेशा नुसार प्रकरणातील स्थागना आदेश रद्द करण्यात आले होतें .
या आदेशावर त्वरित अपिलार्थी ने विनंती अर्ज दाखल करून सुनावणी करावी अशी विनंती कोर्टाला केली असतां मां. अपर आयुक्त नागपुर यांनी ०३ /०६/ २०२२ चा सुनावणीत सदर प्रकरणात अपीलार्थी चा स्टे मान्य केला व अंतिम सुनावणी पर्यंत ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मेश्राम, श्रीकांत रामटेके, अर्चना बनसोड, शुभांगी पाखरे यांचा वरील स्थगना आदेश वर स्टे मंजूर केला.
मा. अपर आयुक्त यांचा आदेशा नुसार तहसील दार नागपुर ग्रामीण, सचिव दवलामेटी तसेच, उप वनसंरक्षक नागपूर वन विभाग यांनी मौजा दवलामेटी येथील खसरा न. ७९ वरील मालकी बाबत चा अद्यावत अहवाल तत्काळ कार्यालयात सादर करावा असे आदेश जाहिर केले.
प्रकाश मेश्राम तंटामुक्ती अध्यक्ष व वरीष्ठ ग्राम पंचायत सदस्य : विरोधकांनी त्यांचा वरिष्ठांची साथ घेऊन आम्हाला जनतेचा सेवे पासुन वंचित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे परंतू आम्हीं ठाम पने दवलामेटी ग्रामपंचायत येथील आमची सत्ता पुर्ण पाच वर्ष टिकऊन ठेऊ व जनतेची सेवा अखेर पर्यंत करत राहू.