
गाववाशी व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने करण्यात आली कारवाई
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर तालुक्यातील उसेगांव वरून जवळच असलेल्या सोनेगाव (गा) येथील उमा नदी पाञातील रेतीचा उपसा वैध नसुन हि अवैध आहे रेतीचा उपसा जेसीबीने ५ दिवसापासुन चालु होता. याची दखल उसेगांव ग्राम पंचायतने घेऊन महसुल विभागाला कारवाईसाठी भाग पाडुन ट्रक व जेसीबी जप्त करण्यात आली. तसेच चिमूर तालुक्यातील उसेगांव वरून जवळच असलेल्या सोनेगाव (गा) येथील उमा नदी पाञातुन ४ जुन पासुन रेतीचा जेसीबीने उपसा चालु होता.
ट्रक व्दारे नेरी – सोनेगाव नदीवर पुलाच्या कामासाठी वाहतुक चालु होती. याची दखल घेत उसेगांव ग्राम पंचायतनी ६ जुन ला रेती भरलेले ट्रक अटकवीले होते. पण तब्बल ८ तास महसुल विभागाचे अधीकारी न आल्यामुळे उलट दुसऱ्या मार्गे रेतीचे ट्रक हलवीण्यात आले.रेती भरलेल्या ट्रकला जप्ती पासुन वाचवीण्यासाठी महसुल विभागाचे अधीकारी सेटींग मध्ये लागले होते.पुन्हा दुसऱ्या दीवशी रेतीची वाहतुक उसेगांव मार्गे चालु होती.उसेगांव वासीयांनी रेतीचे ट्रक गावामधुन जाऊ देण्यास सक्त मनाई करीत होते पण कंञाटदार मुजोरीने व राजकीय दबावाने रेतीची वाहतुक करीत होता.
पण उसेगांव ग्रामपंचायतने कोणापुढे न झुकता दिनांक.९ जुनला १ वाजता सोनेगाव (गा) येथील उमा नदीपाञात जावुन जेसीबीने रेतीचा उपसा चालु होता तेव्हा रेती ट्रक मध्ये भरत असतानी दीसले त्याच वेळी उसेगांव ग्रामपंचायच्या पदाधीकाऱ्यांनी आर.आय.कुमरे यांना फोन व्दारे कळवीले. याची माहिती मिळताच आर.आय. रेती उपसा ठिकाणी पोहचले .तसेच नायब तहसीलदार कोवे हे सुध्दा घटनास्थळी पोहचले. उसेगांव ग्रामपंचायतचे पदाधीकारी या ठिकाणी ठाम मांडुन बसले होते. जेव्हा पर्यंत या अवैध वाहतुक करणाऱ्यावर कार्यवाही व पंचनामा करणार नाही तेव्हापर्यंत आम्ही येथे आमरण उपोषण करू असे महसुल वीभागाच्या अधीकाऱ्यांना बजाविले.अखेर उसेगांव ग्राम पंचायतीच्या या मागणीकडे महसुल विभागाचे अधीकारी झुकुन ट्रक व जेसीबी वर जप्तीची कारवाई केली.
या कारवाईत १०० ब्रास रेती चोरली असल्याचे पंचनाम्यात नमुद केले. ट्रक क्रमांक एम.एच.३४ , ए-३८०३ यांच्यावर जप्तीची कारवाई केल्याची माहीती आहे .१०० ब्रास रेती चोरल्याचा दंड वसुल महसुल विभाग करणार काय ? असा प्रश्न गावकरी करीत आहेत.या कारवाईच्या वेळेस चिमूरचे नायब तहसीलदार कोवे , आर.आय.कुमरे , तलाठी वाघमारे , उसेगांवचे सरपंच प्रियंका पाटील , उपसरपंच नीखील चाफले , ग्राम पंचायत सदस्य ब्रम्हाजी सांदेकर , ऑफरेटर शिगाल पाटील , हे होते.उसेगांव वरून रेतीचे ट्रक नेण्यास गावकऱ्यांचा वीरोध असल्यामुळे गाववासीयांचा सन्मान ठेवुन यापुढे रेतीची वाहतुक उसेगांव मधुन करू नये असे ग्रामपंचायतने महसुल विभागाला व कंञाटदाराला ठणकावले.