
प्रतिनिधी-विशाल
उमरेड:-दिनांक १४/०६/२०२२ ला सकाळ पासूनच उमरेड येथील इतवारी वार्ड येथे वटवृक्षाजवळ महिलांनी गर्दी केली. हिंदू महिला वटपौर्णिमा हा सन पतिदेवांचे आयुष्य वाढावे म्हणून साजरा करण्यात येतो. हे एक सत्य असले तरी या मागचा इतिहास नविन पिढीतील महिलांना माहिती पाहिजे.
सावित्रीचे पती ज्या वेळेस वटवृक्षाच्या झाडावर गेले असता. त्यांचा खाली पडून मृत्यु झाला होता. त्यावेळी सावित्रीने यमदेवाला विनवनी करुन सत्यवानाला जिवंत केले होते. तो दिवस पोर्णिमेचा दिवस होता. तेव्हापासून तो दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. वटवृक्षाच्या झाडाला सात फेरे मारुन, धागा गुंडाळून हाच पती जन्मोजन्मी मिळू दे अशी प्रार्थना महिला करत असतात.