
औषधाच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती,
हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
सावनेर : प्रेयसीसोबत लॉजमध्ये थांबलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरातील घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय परतेकी असे मृत तरुणाचे नाव असून काल संध्याकाळी तो सावनेर शहरातील केशव लॉज मध्ये आपल्या प्रेयसी सोबत आला होता. दोघेही आत गेल्यानंतर थोड्यावेळाने अजय आपल्या रूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळला.व प्रेयसीने त्याच्या मित्रांना बोलावले, त्यांनी पोलिसांना सूचना दिली. मृत अजयच्या खिशातून स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचा साठा मिळाला असून त्याच्या अति सेवनामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.