
पाणी बाहेर निघण्याकरीता एकही नाली नाही
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील तनिस कॉलोनी संपूर्ण जलमय झाल्यामुळे नागरिकांना गढूळ पाण्याने तहांन भागवावी लागत आहे, साचलेले पाणी बाहेर काढण्याकरीत या वार्ड मध्ये नाली नसल्यामुळे पुन्हा एकदा नगरपरिषदच्या नियोजनावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे,
चिमूर शहरातील नेताजी वार्ड, काळकुळ नगर, येथील हिच समस्या आता प्रभाग क्रमांक 10 मधील तनिस कॉलोनी मधील झाली आहे, तनिस कॉलोनी निर्माण झाली तेव्हापासुनच विकासापासून कोसो दूर आहे, ह्या कॉलोनी मधील संपर्ण रोडवर पावसाळाभर पाणी साचलेले असते, साचलेल्या पाण्यामुळे प्रभागातील विहिरीना गढूळ पाणी आले आहे,
नगरपालिकाची सार्वजनिक विहिर असून त्यामध्ये सुद्धा गढूळ पाणी आहे, या कॉलोनी मध्ये पाणी जाण्यासाठी नाल्याची व्यवस्था नाही, या प्रभागात नगरपालिकाची पाणी पुरवठा नसल्यामुळे घरोघरी नळाची स्वतंत्र व्यवस्था नाही, त्यामुळे सर्व नागरिकांना विहिरीचे पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही, या संदर्भात येथील नागरिक वारंवार तक्रार करून सुधा नगर परिषद कर्मचारी वेळ मारून नेत आहे, अस्या परिस्थितित नागरिकांच्या समस्याचे निराकरण करणार कोन असी परिस्थिति निर्माण झाली आहे.